सन बायो मोनस (Pseudomonas fluorescens)

CFU:Pseudomonas fluorescens (1 x 108 Cells / ml)

सन बायो मोनस मधील सुडोमोनस हे जिवाणू पिकांवर येणार्‍या अनेक प्रकारच्या रोगकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी प्रभावी असून डाळींब, द्राक्षे, भात, केळी, मिरची, टोमॅटो, हरभरा, भुईमूग, ऊस यासारख्या पिकांवर येणार्‍या रोपे कोलमडणे, पानांवरील करपा, मर, मुळकूज, भुरी तसेच डाऊनी मिल्ड्यू यासारख्या बुरशी तसेच जिवाणूजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

सन बायो मोनस ची कार्यपद्धती

  • सन बायो मोनस मधील जिवाणूंची वाढ होत असताना विविध प्रकारची प्रतिजैविके तयार होतात. या प्रतिजैविकांमुळे विविध प्रकारच्या रोगकारक बुरशींचा नाश होतो.
  • रोगकारक बुरशींच्या वाढीसाठी लोहाची आवश्यकता असते. सन बायो मोनस मधील जिवाणू रोगकारक बुरशींबरोबर लोह मिळवण्याकरिता स्पर्धा करतात. परीणामी रोगकारक बुरशींना योग्य प्रमाणात लोह न मिळाल्यामुळे त्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांची वाढ खुंटते.
  • प्रतिजैवीकांप्रमाणेच सन बायो मोनस विकरे तयार करते. ही विकरे रोगकारक बुरशींच्या पेशीभित्तीका नष्ट करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवितात.
  • सन बायो मोनस चा वापर केल्याने वनस्पतींच्या पेशींमधील संरक्षक गुणसूत्रे कार्यरत होऊन वाढणार्‍या पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
  • सन बायो मोनस अधिक काळपर्यंत कार्यक्षम रहात असल्याने दिर्घकाळपर्यंत रोगप्रतिबंध होतो.
  • रोगकारक बुरशी व जिवाणूंमध्ये रासायनिक बुरशीनाशकांच्या वापरामुळे येणारी प्रतिकारक्षमता सन बायो मोनस च्या वापराने येत नाही. त्यामुळे सन बायो मोनस रोगनियंत्रणासाठी नेहमीच प्रभावी ठरते.
  • सन बायो मोनसचे जिवाणू वनस्पतींच्या शरीरात प्रवेश करून आंतरप्रवाही बुरशीनाशकासारखे अंतर्बाह्य परिणाम करतात.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीतून

प्रती एकर १ लिटर सन बायो मोनस ५० - १०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

ठिबक सिंचनामधून

प्रती एकर १ – २ लिटर सन बायो मोनस ठिबक सिंचनाद्वारे मुळांशी द्यावे.

आळवणीसाठी

५ - १० मिली सन बायो मोनस प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी.

फवारणीमधून

५ मिली सन बायो मोनस प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी.

बीज/बेणे/कंद प्रक्रिया

१० मिली सन बायो मोनस प्रती किलो या प्रमाणात पाण्यात मिसळून बीज/कंद प्रक्रिया करावी.

सन बायो मोनस वापरण्याच्या अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.

उपलब्धता

१००० मिली / ५००० मिली

Back to Top