सन बायो फोसी

Phosphate Solubilising Bacteria Phosphobacteria (CFU: 1 x 108 Cells / ml)

पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी, फुलोर्‍यासाठी तसेच प्रकाश संश्लेशन क्रियेसाठी स्फुरद हा एक महत्वाचा अन्नघटक आहे. सन बायो फोसी मधील सुक्ष्म जिवाणू जमिनीमधील तसेच खतांमधुन दिला गेलेला स्फुरद विरघळवून पिकांना उपलब्ध करुन देतात. परीणामी पिकांद्‍वारे त्याचे शोषण होऊन पिक वाढीसाठी चालना मिळते.

फायदे

  • सन बायो फोसीमधील उपयुक्त जिवाणू उपलब्ध स्फुरदाच्या प्रमाणात ३०-४० % नी वाढ करतात.
  • स्फुरद विरघळवण्याबरोबरच विविध प्रकारची पिक वाढ संप्रेरके तयार करुन पिकांच्या वाढीला मदत करतात.
  • काही प्रमाणात बुरशीनाशक द्रव्ये निर्माण करून रोगांपासुन पिकांचा बचाव करतात.
  • स्फुरदाची उपलब्धता वाढल्याने पिकांची एकंदर वाढ समाधानकारक होऊन त्यांचा दर्जा व उत्पादनात १०-१५% पर्यंत वाढ होते.
  • जमिनीचे आरोग्य सुधारुन जमिनीची सुपिकता वाढते.

पिके

अन्नधान्ये, तृणधान्ये, फळे, फुले, भाजीपाला व इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

बिज / बेणे प्रक्रिया (प्रती किलो)

१० मीली सन बायो फोसी थंड गुळाच्या द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे. बियाणे / बेणे सावलीत सुकवून त्याच दिवशी पेरणी करावी.

रोपे प्रक्रिया

सन बायो फोसी १० मीली / लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी.

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो फोसी १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

आळवणी

५-१० मीली सन बायो फोसी प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो फोसी पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top