सन बायो पोटॅश

Potash Mobilizing Bacteria (CFU: 1 x 108 Cells / ml)

पिकांच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये पालाश या अन्नद्रव्याची गरज असते. सन बायो पोटॅश मधिल उपयुक्त जिवाणू जमिनीतील पालाश पिकांद्‍वारे शोषण होण्यासाठी चालना देतात. फुलधारणा होताना व फळांची गुणवत्ता आणि वजन वाढण्यासाठी पालाश उपयुक्त असुन पिकांच्या एकूण उत्पादनात वाढ होण्यासाठी आवश्यक असे मुख्य अन्नद्रव्य आहे.

फायदे

  • सुरुवातीच्या काळात मुळांच्या वाढीला प्रोत्साहन मिळून झाडांची वाढ उत्तम होते.
  • जमिनीतील तसेच खतांद्‍वारे दिलेला पालाश मुळांद्‍वारे शोषणास मदत होते.
  • फुलधारणा, फळांची संख्या, फळांची गुणवत्ता तसेच वजनात वाढ होते.
  • पिकांच्या प्रतीकारशक्ती मध्ये वाढ होऊन किड, रोग तसेच वातावरणातील बदलास पिक चांगल्या प्रकारे तोंड देते.
  • पिकांच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये पालाश उपलब्ध होत असल्याने पिकांची सर्वांगीण वाढ होते.

पिके: अन्नधान्ये, तृणधान्ये, तेलबीया, फळे, फुले, भाजीपाला, ऊस, कापुस व इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

बिज प्रक्रिया (प्रती किलो)

१० मीली सन बायो पोटॅश थंड गुळाच्या द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे. बियाणे सावलीत सुकवून त्याच दिवशी पेरणी करावी.

रोपे प्रक्रिया

१० मीली सन बायो पोटॅश प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी.

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो पोटॅश १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

आळवणी

५-१० मीली सन बायो पोटॅश प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो पोटॅश पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top