सन बायो रायझो

Symbiotic Nitrogen Fixing Bacteria Rhizobium (CFU: 1 x 108 Cells / ml)

डाळवर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी तयार करुन सहजीवी पध्दतीने नत्र स्थिरीकरण करणार्‍या जिवाणूंचे मिश्रण सन बायो रायझोमध्ये असुन यांच्या वापराने नत्राबरोबरच पिकवाढीसाठी आवश्यक संप्रेरके निर्माण होऊन पिकांच्या वाढीस चालना मिळते.

फायदे

  • सन बायो रायझोमधील उपयुक्त जिवाणू द्‍वीदल पिकांच्या मुळांवर गाठी तयार करुन त्यामध्ये वाढून हवेतील नत्र स्थिर करतात.
  • हेक्टरी ४०-५० किलो नत्र सहजीवी पध्दतीने स्थिर होऊन पिकांना उपलब्ध होतो.
  • सन बायो रायझो वापरलेल्या पिकांचे जमिनीत राहीलेले अवशेष नंतरच्या पिकालासुध्दा उपयोगी ठरतात.
  • रासायनिक नत्र खतांच्या वापरामध्ये २०% पर्यंत घट होते.
  • बियाण्यांची उगवण क्षमता, पिकांची वाढ तसेच उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
  • जमिनीची सुपिकता व आरोग्यामध्ये वाढ होऊन पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.

पिके: सर्व प्रकारची द्‍वीदल तथा डाळवर्गीय पिके उदा. मूग, उडीद, चवळी, हरभरा, सोयाबीन इ.

वापरण्याचे प्रमाण

बिज / बेणे प्रक्रिया (प्रती किलो)

१० मीली सन बायो रायझो थंड गुळाच्या द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे. बियाणे / बेणे सावलीत सुकवून त्याच दिवशी लागवड करावी.

रोपे प्रक्रिया

१० मीली सन बायो रायझो प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी.

जमिनीमधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो रायझो १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

आळवणी

५-१० मीली सन बायो रायझो प्रती लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करावी.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो रायझो पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली /५००० मीली /१ किलो

Back to Top