सन बायो एस एस बॅक

घटक: (CFU: 2 x 109 Cells / ml)

विविध प्रकारच्या पिकांना जैविक (किड, रोग) तसेच अजैविक (तापमान, पाण्याचा ताण) ताणांना तोंड द्‍यावे लागते. या ताणांना प्रतीकार करण्याची क्षमता सिलीकामुळे वाढते. सन बायो एस एस बॅक मधील उपयुक्त जिवाणू जमिनीमधील सिलीका विरघळवून पिकांना उपलब्ध करुन देतात.

फायदे

  • पिकांना उपलब्ध न होणारा सिलिका विरघळवून उपलब्ध करुन दिला जातो.
  • सिलीकामुळे पिकांना एक प्रकारची मजबूती मिळून त्यांची कीड व रोगांचा प्रतीकार करण्याची क्षमता वाढते.
  • भात, गहू या सारख्या पिकांचे लोळण्याचे प्रमाण कमी होते.
  • जमिनीच्या भौतीक, रासायनिक तसेच जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होऊन सुपिकता वाढते.
  • पिकांची तापमानातील चढउतार तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.

पिके: अन्नधान्ये, फळे, फुले, भाजीपाला, ऊस व इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

जमिनीमधुन (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो एस एस बॅक १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

ठिबक सिंचनामधून (प्रती एकर)

१-२ लिटर सन बायो एस एस बॅक पुरेश्या पाण्यामध्ये मिसळून ठिबक द्‌वारे द्‍यावे.

उपलब्धता

१००० मीली / ५००० मीली / १ किलो

Back to Top