सन बायो ट्रायकार्ड (Trichogramma spp.)

ट्रायकोग्रामा हे परोपजीवी किटक म्हणून ओळखले जातात. या कीटकाची माशी पिकांना हानीकारक कीडींच्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालून हानीकारक किटकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

ट्रायकोग्रामा ऊस, ज्वारी, मका, भात, टोमॅटो, भुईमुग, कापूस, एरंडी, तसेच भेंडी या पिकांवर येणार्‍या खोडकीडी, बोंडअळ्या, फुले तसेच फळे पोखरणार्‍या अळ्या या हानीकारक किडींच्या अंड्यांचा नाश करते.

ह्या कीटकांनी घातलेल्या अंड्यांमधून जन्म घेणार्‍या अळ्या हानीकारक किडींच्या अंड्यामधील बलकाला खाऊन टाकतात. परिणामी त्या अंड्यांमधून हानीकारक अळ्यांचा जन्म होऊ शकत नाही.

ट्रायकोग्रामाचा वापर हा जैविक किड नियंत्रणाच्या सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे कारण यामुळे हानीकारक कीडींचे नियंत्रण त्यांच्या जन्मापुर्वीच होते.

सन बायो ट्रायकार्डचे फायदे

  • हानीकारक किडींची अंडी शोधून काढण्याची क्षमता ट्रायकोग्रामा किटकांमध्ये निसर्गतःच असते. त्यामुळे जिथे अंडी आहेत तिथे जाऊन त्यांचा नाश करतात.
  • अंडी अवस्थेतच किडीचा नाश झाल्याने पिकाचे नुकसान टळते.
  • जसजसा अंड्यांचा नाश होतो तसतशी ट्रायकोग्रामा किटकांची संख्या वाढत रहाते. त्यामुळे आणखी अंडी नाश करण्याची क्षमता वाढते.
  • दाट लागवडीच्या पिकांमध्येसुद्धा वापरण्यास अत्यंत सोपे.
  • एक ट्रायकोग्रामा किटक हानीकारक किडींच्या जवळपास १०० अंड्यांचा नाश करतो.
  • संपुर्णतः नैसर्गीक असल्याने पर्यावरणास अनुकूल व सुरक्षीत.

वापरण्याचे प्रमाण

  • ४-५ ते कार्ड्स प्रती एकर एक आठवड्याच्या अंतराने ३ ते ५ वेळा.
  • कार्ड्स पिकाच्या पानाला खालच्या बाजूला टाचणीने अडकवणे.

उपलब्धता

कार्ड (३ वर्ग सें.मी.)

Back to Top