सन बायो व्हॅम

घटक:
Total Viable Propagules: Min. 60 Spores / g
Infectivity Potential (IP): 1200 IP / g

सन बायो व्हॅम मध्ये VAM नावाच्या विशेषत: ग्लोमस फॅसीक्युलेटम व इतर उपयुक्त बुरशीचे तंतू व पेशीगुच्छ यांचे मिश्रण असून पिकांना आवश्यक असणारी बहूतांश अन्नद्रव्ये यामध्ये शोषण होऊन साठवली जातात. पिकांच्या मुळांभोवती व मुळांमध्ये शिरुन विविध प्रकारची अन्नद्रव्ये; प्रामुख्याने स्फुरद व सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध करुन दिली जातात.

फायदे

  • पिकांच्या मुळांच्या कक्षेबाहेरची अन्नद्रव्ये तंतूद्‍वारे शोषली जाऊन पिकांना उपलब्ध होतात.
  • पाण्याचा ताण असताना मुळांच्या कक्षेबाहेरचे पाणी उपलब्ध करुन दिले जाते.
  • जमिनीतील रोगकारक बुरशी तसेच सुत्रकृमी पिकांच्या मुळांपासुन दूर ठेवले जातात.
  • पिकांना बहूतांश अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होत असल्याने त्यांची जोमदार वाढ होते.

पिके: अन्नधान्ये, तेलबीया, फळे, फुले, भाजीपाला, कापूस व इतर पिके.

वापरण्याचे प्रमाण

बिज प्रक्रीया (प्रती किलो)

२५ ग्रॅम सन बायो व्हॅम थंड गुळाच्या द्रावणात मिसळून बियाण्यास चोळावे. बियाणे सावलीत सुकवून त्याच दिवशी पेरणी करावी.

रोपे प्रक्रीया

१ किलो सन बायो व्हॅम ५० लिटर पाण्यामध्ये मिसळून रोपांची मुळे ५-१० मिनीटांसाठी बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी.

जमिनीमधुन

४ किलो सन बायो व्हॅम १०० किलो शेणखतात / पेंडीमध्ये मिसळून जमिनीत पुरेसा ओलावा असताना पसरुन द्‍यावे.

उपलब्धता

१ किलो / ५ किलो

Back to Top