सन बायो व्हेट्री (Verticillium lecanii)

Verticilium lecanii (1 x 108 Cells / ml)

सन बायो व्हेट्री मधील व्हर्टीसिलीयम लेकॅनी परोपजीवी बुरशी असून प्रमुख्याने रस शोषण करणार्‍या किडींच्या नियंत्रणाकरीता वापरण्यात येते. सन बायो व्हर्टी च्या वापराने पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे (थ्रिप्स), पिठ्या ढेकूण, खवले किड, मुंग्या व कोळी यांसारख्या किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. सन बायो व्हेट्री चा वापर कापूस, सर्व प्रकारचा भाजीपाला व फळपीके, ऊस, कडधान्ये, तॄणधान्ये, तेलबिया, रोपवाटीकेमधील रोपे तसेच कलमे इत्यादींवर प्रामुख्याने होतो.

सन बायो व्हेट्री ची कार्यपद्धती

  • सन बायो व्हेट्री ची फवारणी केल्यानंतर यामधील बुरशीचे बीजकण किडीच्या अंगास चिकटतात किंवा किडींच्या अंगावरील केसांत अडकतात.
  • हवेतील ओलावा, पिकांच्या पानांमधून तसेच जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन यांचा उपयोग करून सन बायो व्हेट्री मधील बुरशीचे बीजकण कीडींच्या अंगावर वाढतात.
  • सन बायो व्हेट्री मधील बुरशीच्या वाढणार्‍या बीजकणांचे टोक अणकुचीदार असल्याने हे बीजकण किडींच्या शरीरात श्वसनछिद्रांद्वारे शिरतात.
  • कीटकांच्या शरीरावर व शरीराच्या आत वाढ होताना हे बीजकण विविध प्रकारची विषारी द्रव्ये किडींच्या शरीरामध्ये सोडतात. यामुळे किडी रोगग्रस्त होऊन त्यांचे नियंत्रण होते.
  • कीटकांच्या शरीरावर सन बायो व्हेट्री मधील बुरशी वेगाने वाढते. त्यामुळे फवारणीनंतर तिसर्‍या दिवसापासूनच कीड मरण्यास सुरुवात होते.

वापरण्याचे प्रमाण

फवारणीमधून

५ मिली सन बायो व्हेट्री प्रती लिटर पाण्यामध्ये मिसळून सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा फवारणी करावी. हवामान कोरडे असल्यास योग्य आर्द्रता राहण्यासाठी फवारणीनंतर लगेच पिकास पाणी द्यावे.

सन बायो व्हेट्री वापरण्याच्या ३-५ दिवस अगोदर व नंतर कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करू नये.

उपलब्धता

१००० मिली / ५००० मिली

Back to Top