TECHNICAL SUPPORT

सन अ‍ॅग्रो बायोटेक रिसर्च सेंटर, चेन्नई

सन अ‍ॅग्रो बायोटेक रिसर्च सेंटर ही संस्था उच्च दर्जाच्या विश्वासार्ह चाचण्यांसाठी, जैवतंत्रज्ञान व किटकनाशकांच्या संशोधन व चाचण्यांसाठी प्रसिध्द आहे. या संस्थेची स्थापना मे १९९९ मध्ये अतिशय उच्चशिक्षित व अनुभवी शास्त्रज्ञांमार्फत करण्यात आली आहे. ही एक बिगर सरकारी ना नफा ना तोटा संशोधन संस्था असून संस्थेची स्वतःची सुसज्ज प्रयोगशाळा असून भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे मान्यताप्राप्त आहे. या संस्थेची विविध वैज्ञानीक महाविद्यालये, कृषी विद्यापिठे तसेच ऑस्ट्रेलियन बायोलॉजीकल कन्ट्रोल लॅब यांच्याशी तांत्रिक भागीदारी आहे. ही तामिळनाडू राज्य सरकार नोंदणीकृत संस्था असून सन अ‍ॅग्रो बायो सिस्टीम्स प्रा.लि.,चेन्नई व सोनकुळ अ‍ॅग्रो इंड्स्ट्रिज प्रा.लि नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात सेंद्रीय व जैविक निविष्ठांचे उत्पादन केले जाते.

यासोबतच विविध कृषी विषयातील शास्त्रज्ञ व इतर संशोधन संस्थांशी सोनकुळ अ‍ॅग्रो ग्रुपने करार केलेले असल्याने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सेवा व उत्पादनांचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच नवनवीन सेवा व उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी केला जातो.

Back to Top