गांडूळ खत

गांडूळांच्या मदतीने सेंद्रीय पदार्थ कुजवून गांडूळ खताची निर्मीती होते. गांडूळखतामध्ये पाण्यामध्ये सहजपणे विद्राव्य अशी मुख्य तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये असतात. गांडूळ खत हे एक अन्नद्रव्यांनी समृध्द असे सेंद्रीय खत व भूसूधारक असून सेंद्रीय शेती मध्ये याचा वापर अन्नद्रव्यांचा उत्तम स्रोत म्हणून केला जातो.

गांडूळ खतामधील घटक

घटक प्रमाण
ओलावा ५२.६१ %
सामू ७.१५ %
नत्र ११.०६ %
स्फुरद(P2O5) ०.६१ %
पालाश(K2O) ०.६८ %

फायदे

  • गांडूळ खतामध्ये पिकांना आवश्यक असणारी सर्व अन्नद्रव्ये असतात.
  • पिकांच्या एकंदर वाढीमध्ये परिणामकारक रित्या वाढ होते. नवीन पाने, फुले तसेच फांदयाची वाढ होऊन उत्पादनाचा दर्जा आणि साठवण क्षमता वाढते.
  • गांडूळखत वापरण्यास अत्यंत सोपे असून हाताळणी व साठवणूकीस सुरक्षीत आहे. याला कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही.
  • गांडूळ खतामुळे जमीनीची जडणघडण, भुसभुसशीतपणा, जलधारणाशक्ती वाढून मातीची धूप कमी होते.
  • गांडूळ खतामध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करुन देणारे तसेच सेंद्रीय पदार्थ वेगाने कुजवीणारे सूक्ष्मजीव भरपूर प्रमाणात आढळतात.
  • गांडूळ खतांमुळे जमीनीमध्ये गांडूळांची संख्या तसेच कार्यक्षमता वाढीस लागते.
  • मातीमधून होणारा अन्नद्रव्यांचा –हास रोखला जाऊन वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
  • गांडूळ खतामध्ये कुठल्याही प्रकारचे हानीकारक सुक्ष्मजीव, विषारी पदार्थ तसेच तणांचे बी इ. नसतात.
  • गांडूळ खताच्या वापराने कीड व रोगांचा प्रादूर्भाव कमी होतो.
  • जमीनीतील सेंद्रीय पदार्थ कुजवीण्याची प्रक्रीया वेगाने होते.
  • अन्नद्रव्यांव्यतीरीक्त पिकांना आवश्यक असणारी संजीवके, संप्रेरके गांडूळ खतामध्ये असतात.
Back to Top