व्हर्मीक्युलाईट

उच्च तापमानाला फुलवीण्याची प्रकीया केल्यानंतर व्हर्मीक्युलाईट पिकांसाठी माध्यम म्हणून वापरले जाते. पिकवाढीच्या माध्यमाचा भुसभुसशीतपणा वाढवून, ओलावा तसेच अन्नद्रव्ये टिकवून ठेवण्याची क्षमता वाढून मुळांची वाढ तसेच बियाण्याची उगवण यांना मदत होते.

वापरण्यास सोपे, हानिकारक बुरशीरहीत व गंधहीन या वैशिष्टयांमुळे व्हर्मीक्युलाईट एक चांगले माध्यम म्हणून वापरले जाते.

गुणधर्म

रंग तांबूस तपकिरी
विशीष्ठ गुरुत्व २.५
घनता १२० – १५० की / घ . मी
सामू ७.० ते ९.५
कणांचा आकार ६ – ४० मेश

फायदे

  • व्हर्मीक्युलाईट स्वच्छ, गंधहीन, बिनविषारी तसेच निर्जंतूक असून त्यामध्ये हानीकारक बुरशीचीं वाढ होत नाही.
  • पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये संतुलीत प्रमाणात उपलब्ध करुन दिले जातात.
  • कोकोपीट, कंपोस्ट सारख्या पदार्थांसोबत वापरल्याने मुळांची भरघोस वाढ तसेच मुळांना मजबूतपणे आधार देण्याचे काम करते.
  • हवा, अन्नद्र्व्ये तसेच पाणी धरुन ठेवून पिकांच्या गरजेनुसार उपलब्ध करुन देते.
  • छाट कलमांच्या मुळांची वाढ लवकर होण्यासाठी वापरले जाते.
  • हे एक उत्कृष्ट भूसुधारक असून जमीनीमध्ये सहजपणे मिसळता येते.
  • हायड्रोपॉनीक्स / मातीविरहीत शेतीमध्ये वापरण्यास योग्य.
Back to Top