पाणी परिक्षण

पाणी परिक्षणाचे मगत्व

  • पाण्यातील क्षारता कळण्यासाठी व कमी व जादा प्रमाणातील क्षारांवर योग्य तो उपाय करण्यासाठी.
  • पाण्याचा सामू जाणून घेण्यासाठी.
  • पिकास पाण्याची नियोजन ठरविण्यासाठी.
  • पाण्यापासून होणारे संभाव्य धोके अथवा फायदे यांचा अंदाज येण्यासाठी.
  • या निदानांवरुन कोणत्या प्रकारचे पिक जमिनीस योग्य आहे हा निष्कर्ष काढता येतो.
  • ठिबक मधून द्यावयाच्या खतांच्या मात्रांचे अचुक नियोजन करता येते.
  • पाण्याचे नियोजन व बचत शक्य होते.

परिक्षणासाठी पाण्याचा नमुना घेणे

पाणी नमुना घेण्यासाठी सुरवातीला आपल्या विहिरीतील मोटार किंवा बोअरची मोटार ५ ते १० मिनिटे चालु ठेउन त्यानंतर येणारे पाणीच तपासणीसाठी घ्यावे. यासाठी एक स्वच्छ मिनरल पाण्याची बाटली घेऊन त्यामध्ये ५०० मिली ते १ लिटर एवढ्या प्रमाणात पाणी परिक्षणासाठी आणावे.

पाणी परिक्षणामध्ये तपासले जाणारे घटक

घटक
सामू पालाश गंधक तांबे आर.एस.सी. इंडेक्स
विद्‍युत वाहकता (क्षारता) सोडियम क्लोराईड जस्त संपूर्ण विरघळलेले क्षार (T.D.S.)
कार्बोनेट्स कॅल्शियम काठीण्य (Hardness) लोह संपूर्ण विरघळलेले क्षार(T.D.S.)
बायकार्बोनेट्स मॅग्नेशियम एस.ए.आर मॅग्नेशियम कॅल्शियम मॅग्नेशियम गुणोत्तर

पिण्याच्या पाण्याचे परीक्षण

  • एकुण कॉलीफोर्म
  • इ.कोली
  • एकुण जिवाणू संख्या

माती/ वनस्पती सुक्ष्मजीव परिक्षण

तपासले जाणारे घटक

  • एकुण बुरशीजन्य व जिवाणुंचे प्रमाण
  • माती आणि वनस्पती मध्ये रोगकारक बुरशी ओळख
  • माती आणि मुळांच्या गाठीवरील सुत्रकृमी
Back to Top