बायो आॅरगॅनिक इंडस्ट्रिज

सेंद्रिय जैविक शेती ही काळाची गरज असुन त्यादृष्टीने जागतीक तसेच राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. यात खाजगी संस्था, सरकारी संस्था, शेतकरी, कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्रे, राज्यशासन व केंद्र शासन सहभाग घेत आहेत. रासायनिक पध्दतीने उत्पादित केलेल्या शेतमालाचे विपरीत परिणाम आता ग्राहकांच्या लक्षात येत आहेत.

दिवसेंदिवस रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत कमी होत असून पिकांवर येणा-या रासायनीक औषधांप्रती पचनक्षमता वाढत आहे. त्यामुळे अधिकाअधिक तीव्रतेची रासीयनीक किटकनाशके व बुरशीनाशके वापरावी लागत आहेत.