के – ऑईल

घटक:  Botanical Extract – 90%
Emulsifier – 10%

के ऑईल एक नैसर्गीक वनस्पतीजन्य उत्पादन असून पिकांवर येणार्‍या विविध प्रकारच्या किडींचे प्रभावी व्यवस्थापन करून पिकांचा बचाव करते. हे उत्पादन रस शोषणारे किटक तसेच विविध प्रकारच्या अळींपासून पिक संरक्षण करण्याकरीता उपयोगी आहे.

के ऑईलमधील वनस्पतीजन्य अर्क ६०० हून अधिक प्रकारच्या हानीकारक किटकांवर प्रभावी परिणाम घडवून आणतात. त्याचबरोबर सुत्रकृमी व रोगकारक बुरशींवरदेखील प्रभावी ठरते.

के ऑईल पिकांवरील मित्र किटक, मधमाशा, पक्षी, जनावरे तसेच मनुष्यप्राण्यांसाठी संपुर्णतः सुरक्षीत आहे.

के ऑईल नैसर्गीक उत्पादन असून यामुळे किटकांची अंडी घालण्याची, रस शोषण करण्याची तसेच खाण्याची क्षमता कमी होते व परिणामी पिकांचा हानीकारक किटकांपासून बचाव होतो.

के ऑईल पुर्णपणे रसायनमुक्त व पर्यावरणपुरक उत्पादन असून रसायनांना एक प्रभावी पर्याय आहे.

वापरण्याचे प्रमाण

४-५ मिली के ऑईल प्रती लिटर पाण्यामध्ये फवारणीसाठी वापरावे. चांगल्या परिणामांसाठी फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशीरा करावी.

उपलब्धता

१ लिटर / ५ लिटर

Back to Top